सुशील ओझा, झरी: झरी पाटण येथे एका शेतक-याच्या बैलाला सर्पदंश झाल्याने यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. यात शेतकऱ्याचे ६० हजाराचे नुकसान झाले.
मो. इरफान मो. युसूफ या पाटण येथील शेतक-याची गावालगतच शेती आहे. त्यांनी संध्याकाळी आपले दोन बैल शेतात बांधले. मात्र रात्री त्यातील एका बैलाला विुषारी सापाने चावा घेतला. त्यात बैलाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी जेव्हा इरफान शेतकरी शेतात गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लगेच याची माहिती महसूल विभाग व गावकर्यांना दिली.
मंडळ अधिकारी देशपांडे व तलाठी येरमे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असता बैलाची किंमत ६० हजार रुपये झाल्याची नोंद केली. त्यावेळी सरपंच रमेश हललवार, विलास आत्राम, अशोक गिज्जेवार, राजेश कार्नेवार, कैलास ननावरे उपस्थित होते. ऐन शेतीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या बैलाच्या मृत्यूमुळे शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.