वडगाव बायपासजवळ धावता ट्रक जळाला

ट्रक चालकाने तात्काळ उडी घेतल्याने टळला अनर्थ....

बहुगुणी डेस्क, वणी: वडगाव बायपासवरून चंद्रपूर येथे जाणारा ट्रक जळला. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ट्रक डीटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वणी-चिखलगाव बायपासवर वडगाव जवळ एका कोल सप्लायर कंपनीच्या शेजारी ट्रक चालकांचा थांबा आहे. या ठिकाणी ट्रक चालक विश्रांती घेतात. या थांब्यावरून पहाटे 4 वाजताच्या सुमारास ट्रक चालक वादील शहा हा (MH 29 Q 6168) ट्रक घेऊन कामानिमित्त चंद्रपूर येथे जात होता. मात्र ट्रक सुरु करून अवघे 50 मीटरचे अंतर कापत नाही तो पर्यंत ट्रकच्या कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाली व कॅबिनने पेट घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ट्रकने पेट घेतात चालकाने तातडीने ट्रक बंद करून ट्रकच्या कॅबिनमधून उडी मारली. जवळील लोकांनी तातडीने याची माहिती पोलीस स्टेशनला व फायर ब्रिगेडला कळवली. फायर ब्रिगेडचे चालक देविदास जाधव, फायरमॅन दीपक वाघमारे व रितेश गौतम हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तात्काळ आग विझवली. या आगीत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली. तर ट्रॉलीमध्ये कोणताही माल नव्हता. 

Comments are closed.