फेब्रुवारी पासून होणार पसंतीच्या चॅनल्सची अंमलबजावणी

'ट्राय'चा निर्णय –अनावश्यक चॅनल्स, अतिरिक्त शुल्कातून होणार ग्राहकांची सुटका 

0
विलास ताजने, वणी :  दुरसंचार नियामक आयोगाने म्हणजेच ‘ट्राय’ ने नव्या नियमानुसार ग्राहकांना चॅनल्स निवडण्याची मुदत २९ डिसेंबर पर्यंत दिली होती. सदर निर्णयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबरला रात्री सात ते दहा वाजेपर्यंत प्रसारण बंद ठेवण्याची घोषणा प्रसारक कंपन्या आणि केबल चालकांनी केली होती. त्याचवेळी सदर नियम लागू करण्यासाठी  मुदत मागितली होती. 

त्याअनुषंगाने ‘ट्राय’ ने ३१ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी थांबवली होती. तथापि आता १ फेब्रुवारी पासून पसंतीच्या चॅनल्सची अंमलबजावणी होणार आहे. ‘ट्राय’ च्या नव्या नियमानुसार १ फेब्रुवारी पासून प्रेक्षकांची अनावश्यक चॅनल्स आणि अतिरिक्त शुल्कातून सुटका होणार आहे. डिटीएच कंपन्यांना १०० चॅनल्स केवळ १३० रुपयांत दाखवावी लागणार आहे.
तसेच प्रसार वाहिन्या आणि केबल ऑपरेटर्सना नव्या नियमावलीनुसार एका वाहिनीला जास्तीत जास्त १९ रुपयांपर्यंत शुल्क आकारता येणार आहे. मात्र ‘ट्राय’च्या या निर्णयामुळे प्रसारक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. परिणामी प्रसारक कंपन्या सदर निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.