वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर

शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी: माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल येथे मंगळवारी दिनांक 24 जानेवारी रोजी भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 ते दु. 4 वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे. लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वणी व गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अदिलाबाद यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. झरी तालुका काँग्रेस कमिटी व वणी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत नुगुरवार, प्रसुती व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा व डॉ. अनुपमा कासावार, ऑर्थोपेडिक व वातरोगतज्ज्ञ डॉ. सुबोध अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मानवतकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, दंतरोगतज्ज्ञ डॉ. मृणाल नुगुरवार, दमारोगतज्ज्ञ डॉ. आशिष केंद्रे, पोटविकार तज्ज्ञ डॉ. देविदास शामला हे रुग्णाची तपासणी करणार आहे.

या भव्य आरोग्य शिबिरात व रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन झरी व वणी तालुका काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.