काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले रविवारी वणीत

शेतकरी मंदिरात अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ मेळाव्याचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून महविकास आघाडीतर्फे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धीरज लींगाडे यांच्या समर्थनार्थ रविवार 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता येथील शेतकरी मंदिरात पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

वणी विधानसभा मतदार संघात तब्बल 7 हजार पदवीधर मतदार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नाने अधिकाधिक पदवीधर मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली. या मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना मतदान करावा यासाठी ठिकठिकाणी पदवीधर मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

वणी विभागातील पदवीधर मतदारांनी या मेळाव्यात आवर्जून उपस्थित राहावे तसेच महविकास आघाडी उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीचा मत देऊन बहुमताने विजयी करावे, असे आवाहन वणी विधानसभा काँग्रेस कमिटी व डॉ. महेंद्र लोढा यांनी केला आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!