कॅन्सर जनजागृती रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष

'लढा कॅन्सरविरोधात' अंतर्गत स्केटिंग मॅराथॉनचे आयोजन

0

निकेश जिलठे, वणी: शनिवारी कॅन्सर विरोधात प्रसाराअंतर्गत सकाळी रॅली आणि स्केटिंग मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये सुमारे 500 लोकांनी सहभाग घेतला होता. तर स्केटिंग मॅराथॉन स्पर्धेत सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. हे दोन्ही कार्यक्रम डॉक्टर असोसिएशन व सुशगंगा पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. महेंद्र लोढा होते. तर या कार्यक्रमाला अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटच्या कॅन्सर तज्ज्ञांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी सात वाजता टिळक चौकात कॅन्सर जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. तंबाखू, खर्रा, सिगारेट हे कॅन्सरचं प्रमुख कारण मानलं जातं. याविरोधात ही जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली टिळक चौकातून लोकमान्य टिळक महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीचा समारोप टिळक चौकात झाला. यावेळी कॅन्सरविरोधात जनजागृती करणारे फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीत सुमारे 500 लोक सहभागी झाले होते.

रॅलीनंतर स्केटिंग मॅराथॉनला सुरुवात झाली. ही स्पर्धा सहा गटात घेण्यात आली. यात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ‘लढा कॅन्सर विरोधात’ अशी या मॅराथॉनची थिम होती. प्री प्रायमरी गटात पहिले बक्षीस श्री बलकी, दुसरे बक्षीस निरंथ अंबागडे तर तिसरे बक्षीस दक्ष पाम्पट्टीवार यांना मिळाले. वर्ग 1 ते 3 या गटात पहिले पक्षीस काव्या बोंडे, द्वितीय बक्षीस साई वरियावार, तर तिसरे बक्षीस कुणाल शर्मा यांना मिळाले.

वर्ग 4 ते 5 गटात इनलाईन प्रकारात सयम, शाहबाज व अयान मिर्जा यांना अनुक्रमे पहिले दुसरे व तिसरे बक्षीस मिळाले. याच गटात हायपर या प्रकारात पहिले बक्षीस क्रीष्णा दिकुंडवार, दुसरे बक्षीस देवांश वर्मा, तर तिसरे बक्षीस विक्रांत बोधटकर यांना मिळाले. वर्ग 6 ते 9 गटात पहिले बक्षीस नीलेश शर्मा, दुसरे बक्षीस अयान रफिक, तर तिसरे बक्षीस तक्षा चहाणकर यांना मिळाले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना शिल्ड आणि प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. रॅलीच्या आणि स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुशगंगा पब्लिक स्कूल चे कर्मचारी व शिक्षक, डॉक्टर असोसिएशनचे सदस्य व जैन सोशल ऑर्गानायझेशन वणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.