बहुगुणी डेस्क, वणी: गुंजच्या मारोतीजवळ रस्ता क्रॉस करणा-या एका तरुणाला भरधाव कारने जबर धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विजय भदुजी आत्राम (44) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दामोदर नगर येथे राहत होता. तो घुग्घुस रोडवरील टोल नाक्यावर काम करीत होता.
प्राप्त माहितीनुसार, विजय हा घराच्या काही अंतरावरच असल्याने विजय पायीच कामाला जायचा. शनिवारी तो नेहमीप्रमाणे दुपारच्या शिफ्टला गेला होता. शिफ्ट संपल्यानंतर तो रात्री घरी दामोदर नगर येथे परतत होता. संविधान चौकाजवळून तो दामोदर नगरकडे रस्ता ओलांडत होता. दरम्यान 8.30 वाजताच्या सुमारास वरो-याकडून वणीच्या दिशेने येणा-या एका भरधाव पांढ-या रंगाच्या भरधाव कारने (Mh29ar 5393) धडक दिली.
अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. विजयला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र विजयची प्रकृती गंभीर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रविवारी विजयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या चौकात सातत्याने अपघाताच्या घटना होत असल्याने हा चौक यमलोकाचे दार बनले आहे.
Comments are closed.