चोरट्यांनी चोरली कार…. पण डाव फसला

वणीतील विठ्ठलवाडी येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: अज्ञान चोरट्यांनी कार तर चोरली मात्र नेताना ती मध्येच पंक्चर झाल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. वणी शहरातील विठ्ठलवाडी येथील ही घटना आहे. सोमवारी रात्री ही कार पोलिसांनी जप्त केली.

शहरातील विठ्ठलवाडी येथे अमर विठ्ठल दानव राहतात. त्यांच्याकडे मारोती अर्टिका (MH29 AD-4948) ही कार आहे. रविवारी रात्री त्यांच्या घरासमोर कार उभी होती. मात्र सकाळी ते उठले असता त्यांना तिथे ती कार दिसली नाही. गाडीची शोधाशोध केल्यानंतरही कार आढळून न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास सदर कार वणी-वरोरा रोडवर पंक्चर असलेली आढळून आली. चोरट्यांनी तर चोरली मात्र ती मध्येच पंक्चर झाल्याने चोरट्यांनी ती तिथेच ठेऊन पोबारा केल्याचा अंदाज बांधला जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.