जितेंद्र कोठारी, वणी: वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी न घेता तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता बेकायदेशीरपणे रुग्णांवर एलोपेथी पद्धतीने वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर विरुद्ध मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नित्यानंद दास असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
आरोग्य विभागाकडून मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु आहे. मारेगाव शहरात डॉ. नित्यानंद दास (40) हा अवैधरित्या वैद्यकीय प्रक्टिस करताना आढळून आला. तालुका वैदकीय अधिकारी डॉ. अर्चना वाल्मिक देठे यांनी दास याला डिग्री व वैदकीय व्यवसाय परवानगी बाबत विचारणा केली. मात्र त्याच्याकडे डिग्री व परवाना आढळला नाही.
त्यावरून सदर व्यक्ती रुग्णांवर अवैधरित्या उपचार करून त्यांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य पथकाने तथाकथित डॉ. दास यांच्या क्लिनिकची झडती घेतली असता त्याच्याकडे एलोपैथी औषधीचा साठा सापडला. पथकाने सर्व औषधसाठा जप्त करून पोलिसांच्या सुपूर्द केला.
फिर्यादी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे यांच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर नित्यानंद दास विरुद्द महाराष्ट्र वैदकीय व्यवसाय कायदा 1961 कलम 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनात पो.कॉ. आनंद अलचेवार करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.