अबब…! 12 फुटांचा महाकाय अजगर…

शर्थीच्या प्रयत्नानंतर अजगरास पकडण्यात सर्पमित्रांना यश

0

वणी, पुरुषोत्तम नवघरे: आज बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी भालर येथील एका शेतातून एक महाकाय अजगर सर्पमित्रांनी पकडला. हा अजगर 12 फुटांचा आहे. वणीतील तीन सर्पमित्रांनी या अजगराला शर्थीच्या प्रयत्नानंतर पकडले. पकडण्यात आलेल्या अजगराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील भालर शेत शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून अजगर असल्याची चर्चा होती. भालर येथे शंकरराव धांडे यांचे शेत आहे. आज या अजगराने धांडे यांच्या शेतात प्रवेश केला व शेतात राखणीसाठी असलेल्या कुत्र्याला आपले भक्ष बनविले. धांडे हे शेतात गेल्यावर त्यांना अजगराने कुत्र्याला भक्ष बनवल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वणीतील सर्पमित्रांना याची फोनवरून माहिती दिली.

माहिती मिळताच वणीतील सर्पमित्र हरीश कापसे, अनिकेत कुंभरे व नितीन मानुसमारे हे तात्काळ भालर येथील धांडे यांच्या शेतशिवारात गेले. तिथे त्यांना 12 फूट लांबीचा अजगर आढळला. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांना या अजगराला जेरबंद केले.

पकडण्यात आलेल्या अजगराचे वजन 35 किलो असल्याची माहिती हरिश कापसे यांनी दिली. अजगराला जेरबंद करून वणी वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भालर शिवारात अजगर असल्याची चर्चा होती. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र आता अजगराला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.