सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील मुकुटबन येथे शासनाने सीसीीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केल्याने बळी राजा सुखावला आहे. परंतु शेतकऱ्याचे घरी एक महिन्या पासून कापूस पडून आहे. त्याचे वजन कमी झाले आहे. शेतकऱ्यांच्या कापसात पाण्याचा थेंब नाही तसेच उन्हाचा तडाखा आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही परंतु सीसीआय खरेदी मध्ये 10 ते 20 %पाणी आहे म्हणून कट्टी करीत आहे.
आधीच कोरोना मुळे देश परेशान आहे. सततच्या नापिकी मुळे शेतकरी परेशान आहे. सीसीआयच्या मोईचर मशीन मध्ये पाणी दाखवीत असल्याने शंका व्यक्त केली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय वाल्यानी जसा आहे तसाच सरसकट खरेदी करावा व वजनकाटा झाल्या बरोबर तिथेच दुसऱ्या दिवशी वटणारा चेक शेतकऱ्याला द्यावा.
शेतकऱ्यांना बाजारातील प्रत्येक वस्तू नगदी पैसे देऊन घ्यावी लागते जर शासनच उधारीत माल खरीदी करीत असेल शेतकरी आपल्या उपजीवेकेचे वस्तू कश्या खरेदी करणार शासनाचे नियम आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शासनाला ग्राहक प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला.
निवेदनात जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे जिल्हा कार्याध्यक्ष दामोधर बाजोरीया, उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने सहसचिव भैय्यासाहेब ठमके, जिल्हा सल्लागार प्रमुख हनमंतू रजलनलवार, अभय निकोडे, पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोज गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई, ,आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक , मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम,आनंद नक्षणे,पंकज नेहारे, शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार ,अजय दुमनवार ,विजय अग्रवाल पाटणबोरी ,नितेश चव्हाण रुंझा विभाग यांच्या सही आहेत.