मॅकरून स्टुडन्ट्स अकॅडमीत संविधान दिन उत्साहात साजरा

सर्वांना एकत्र ठेवणारा दुवा म्हणजे संविधान - शोभना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवत घटनेचे पालन करण्याची शपथ घेतली.

शिक्षिका विद्या फुलझेले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थित शिक्षकांनी आपले विचार मांडले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल शोभना यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की…

सर्वांना एकत्र ठेवणारा दुवा म्हणजे संविधान – शोभना
आपल्या देश हा विविध धर्म, संप्रदाय, भाषा, संस्कृती इत्यादींनी नटलेला आहे. मात्र या सर्वांना एका माळेत गुंफून देशात एकात्मता निर्माण करण्याचे काम संविधान करते. भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयांचे हक्क व अधिकाराचे संरक्षण करते त्यामुळे संविधान हा मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. संविधानाने लोकशाही प्रजासत्ताक बनण्याला प्राधान्य दिलं आहे, भारतीय राज्यघटनेतल्या उच्च मूल्यांचं रक्षण करणं हे देशाचे उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
– शोभना, प्रिन्सिपल- मॅकरून स्टुडन्ट्स अकादमी

या कार्यक्रमाचे निखिल घाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

शिरपूर: अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

वणीत संविधान दिन साजरा, विविध उपक्रमाचे आयोजन

Comments are closed.