वणीत प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस साजरा

सुतारपुरा येथील महादेव मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: प्रभू विश्वकर्मा यांना कुशल कारागिराचे दैवत तथा देवतांचे कारागीर समजले जाते. 17 सप्टेंबर विश्वकर्मा यांची जयंती पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वणीतील महादेव मंदिर, सुतारपुरा येथे विश्वकर्मा पूजन दिवस साजरा करण्यात आला. मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. देवतांचे शिल्पकार म्हणून यांची ओळख असून प्रभू विश्वकर्मा यांनीच देवतांचे अस्त्र-शस्त्र, महल, स्वर्ग, इंद्रपुरी, यमपुरी, महाभारत काळाची द्वारिका, त्रेतायुगाची हस्तिनापुर आणि रावणाच्या लंकेच निर्माण केलं होतं. प्रभू विश्वकर्माबाबत “देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे.

प्रभू विश्वकर्मा यांचा जन्म 17 सप्टेंबर रोजी झाल्याचे मानले जात असून हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो. प्रभू विश्वकर्मा यांच्या जन्माबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असून विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मा यांच्या पुत्र धर्माच्या सातव्या संतान वास्तु देवाच्या ‘अंगिरसी’ नावाच्या पत्नीद्वारे झाल्याचे मानले गेले आहे.

या दिवशी ऑफिस, उद्योग, दुकानदार, फॅक्ट्रीज येथे लागलेल्या मशीन पुजल्या जातात. या दिवशी लोकं आपल्या घरातील वाहन, मोटर आणि इतर वस्तूंची पूजा देखील करतात. सुतार समाज कार्यकारीणीचे अध्यक्ष अमन बुरडकर यांचे हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे चे विधिवत पूजन करू तीर्थ, प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अमन बुरडकर, युवा मंच अध्यक्ष महेश राखुंडे,महिला मंच अध्यक्षा रत्नाताई अंड्रस्कर, दौलत झिलपे, शालीक दुधलकर, मंगलाताई झिलपे, पुरुषोत्तम नवघरे, प्रशांत झिलपे, राजेंद्र मुरस्कर, हर्षल घोंगे, तोषिल झिलपे, रूपक अंड्रस्कर, कल्पक अंड्रस्कर, रितेश साखरकर, रितीक झिलपे, शैलेश झिलपे, हरिभाऊ झिलपे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments are closed.