पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाला सुरूवात

वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला पंतप्रधानांचा वाढदिवस

जब्बार चीनी, वणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दि. आजपासून या सप्ताहाला सुरवात झाली आहे. 25 सप्टेंबर हा उपक्रम चालणार आहे. कोणतेही बॅनर होर्डिंग टाळून त्या ऐवजी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून हा सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. आज दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पळसोनी येथील संत बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील निराधारांना भेटून या उपक्रमाला सुरवात झाली. उपस्थितांनी वृद्ध लोकांसोबत केक कापून कापला. त्यानंतर चादर, फळाचे वाटप व मिष्ठान भोजन देण्यात आले. याशिवाय आमदारांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या आवारात वृश्रारोपणही करण्यात आले. 

यावेळी बोलताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वृद्धाश्रमाच्या विकास कामाकरीता लागणारी सर्व मदत तसेच आश्रमातील वृद्धांना ये-जा करीता बारमाही रस्त्याची सोय करून दिली जाईल असे आश्वासन दिले. आश्रमात एक टिव्ही लावून देण्याची जवाबदारी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोडे यांनी घेतली. तर विजय पिदूरकर यांनी दर वर्षी पाच हजार रूपयांची देणगी देण्याचे कबुल केले. या कार्यक्रमाच्या संयोजिका स्मिताताई नांदेकर, शहर व तालुका भाजपा महिला आघाडी या होत्या.

उद्या शनिवारी दिनांक 18 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता वणी शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संयोजक भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे आहेत. तर रविवारी दि. 19 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या निराधार कुटुंबाचे सांत्वन व त्यांच्या घरी जाऊन मदत दिली जाणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर हे करीत आहेत.

दि. 20 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 7 वाजता वणी येथील गौरक्षणाला भेट देऊन या ठिकाणी गो-मातेची सेवा केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा वणी तालुका अध्यक्ष गजानन विधाते हे करणार आहे. मंगळवारी दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे संयोजन जिल्हा सचिव किशोर बावणे करणार आहे.

दि . 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता येथील 100 सफाई कामगारांना भाजपाच्या वतीने विमा काढून त्या पॉलिसीचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नितीन वासेकर हे करणार आहेत. दि. 22 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप केल्या जाते की नाही , शासनाच्या निकषाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानात गरिबांना सेवा पुरविल्या जाते की नाही या ही शहानिशा दिवसभर केली जाणार आहे. याचे संयोजन जिल्हा सचिव किशोर बावणे हे करणार आहेत.

दि . 23 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता कायर येथे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे संयोजन जिल्हा परिषद सदस्या व गटनेत्या मंगला पावडे व पंचायत समितीच्या माजी सभापती लीशा विधाते या करणार आहेत.

मॅराथॉन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
दि. 25 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेचे संयोजन भाजयुमोचे संदीप बेसरकर, अवि आवारी, आशिष डंभारे, शुभम गोरे व पदाधिकारी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आंबेडकर चौकातील भारतरत्र अटलबिहारी वाजपेयी सभा मंडपात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे संयोजन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे करणार आहेत. दिनांक 16 सप्टेंबर रोजी वणीतील शासकीय विश्राम गृहात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सेवा सप्ताहाबाबत माहिती दिली. 

वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमात जिल्हा महामंत्री रवी बेलुरकर, पंचायत समितीचे सभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपाचे जेष्ठ नेते दिनकरराव पावडे, जिल्हा परिषद गट नेत्या मंगलाताई पावडे, जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर,जिल्हा सचिव किशोर बावने, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, राकेश बूग्गेवार, संध्याताई अवताडे, शहर अध्यक्षा आरती वांढरे, जलपूर्ती सभापती निलेश होले, आशिष डंभारे, अवी आवारी, संदीप बेसरकर, सरपंच कैलास पिपराडे, नितीन वासेकर, दिपक पाऊनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष वाद पेटला, निवडणूक की आणखी काही…?

Comments are closed.