मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा जल्लोषात साजरा

आज संध्या. 6 वाजता शहरातून निघणार भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. आज दुपारी 12 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच काला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या कार्यक्रमाला संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे. 

गुरुवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विजय चोरडिया यांच्या निवासस्थानावरून श्रीकृष्ण मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. सजवलेल्या पालखीची मिरवणूक काढून अमृत भवन येथे मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. रात्री 8.30 वाजता श्रीकृष्ण जन्म या विषयावर मारेगाव येथील सविता ठेंगणे व संच यांनी श्रीकृष्ण चरित्र कथा ही नाटीका सादर केली. मध्यरात्री 12 वाजता मुख्य कार्यक्रम श्रीकृष्ण जन्म सोहळ्याला सुरुवात झाली. 

रात्री महाआरती घेण्यात आली. भाविकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जन्म सोहळा साजरा केला. जन्मोत्सवा निमित्त अमृत भवनला विद्युत रोशनाईची सजावट करण्यात आली होती. जन्म सोहळ्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. जन्म उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दरम्यान उत्सव समितीचे माजी अध्यक्ष विजय चोरडिया यांचा तिथीनुसार वाढदिवस असल्याने त्यांनाही यावेळी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. आज शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 

रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – ऍड कुणाल चोरडिया
आज संध्याकाळी 6 वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. डीजे तसेच इलेक्ट्रॉनिक वाद्यांना फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या साथीने ही शोभायात्रा अमृत भवन येथून निघणार आहे. विविध देखावे, रथ, वेशभूषा इत्यादी या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. या शोभायात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशी सर्वांना विनंती आहे.
– ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया, अध्यक्ष जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका-उपाध्यक्ष, हितेश गोडे -उपाध्यक्ष, सागर जाधव – सचिव, अमोल धानोरकर – सहसचिव, सचिन क्षीरसागर – कोषाध्यक्ष, राजू रिंगोले – सह कोषाध्यक्ष, पियूष चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, मयूर गेडाम – सह, प्रसिद्धी प्रमुख, रितेश फेरवाणी – कार्याध्यक्ष, शुभम मदान – सह कार्याध्यक्ष यांच्यासह

आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादी परिश्रम घेत आहे.

हे देखील वाचा:

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

Comments are closed.