विवेक पिदूरकर, शिरपूर: द ग्रेट पीपल्स गृप ऑफ यवतमाळ या संघटनेच्या वणी शाखेतर्फे परिसरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 26 मे रोजी विविध उपक्रम राबवून बोधीसत्व भगवान बुद्धांना अभिवादन कऱण्यात आले. भोजनदान, आरोग्य तपासणी शिबिर, डॉ. बाबासाहेब आंबेडरांची प्रतिमा भेट तसेच रेबिजची लसीकरण असे विविध उपक्रम दिवसभर राबवण्यात आले.
सकाळी शिरपूर येथील पोलीस स्टेशनच्या सभागृहात पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मॉडन लॅबच्या वतीने व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कर्मचा-यांची लिक्विड प्रोफाइल बॉडी टेस्ट व इतर टेस्ट कऱण्यात आल्या. 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी या शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिराला ठाणेदार सचिन लुले व सपोनि रामेश्वर काठुळे, सपोनि मुकुंद कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाज सेवा हिच खरी इश्वरसेवा आहे असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक भेऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिरपूरचे सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच मोहित चचडा, डॉ. अभिनव कोहडे, दत्ता बोबडे, दिनेश रायपुरे, राहुल वनकर, स्वप्निल सानेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी प्रवीण आस्वले, अश्विनी बरडे, किल्ला सुखदेव व खासगी लॅबच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
दुपारी 4 वाजता वणी येथील टोलनाकाजवळ कर्मचारी आणि गरजूंना भोजनदान करण्यात आले. तसेच टोलनाक्याच्या कार्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी लालगुड्याचे सरपंच धर्मपाल चालखुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संध्याकाळी रेबिज या रोगांची लागण होऊ नये म्हणून श्वानांना रेबिजचे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द ग्रेट पीपल्सचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा: