चेस प्रशिक्षणार्थी इंग्रजी शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात चेस उपक्रम सुरू

0

सुशील ओझा, झरी: मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती असते. ती दूर व्हावी, जागतिक भाषा सहज, सोपी वाटावी म्हणून शिक्षण विभागाने ‘कंटिन्युअस हेल्प टू दी टीचर ऑफ दी इंग्लिश फॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील इंग्रजी शिक्षक आशिष अशोक साबरे यांची शासनातर्फे झरी तालुक्याचे इंग्लिश टीचर फोरमचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी गट संसाधन केंद्र पंचायत समिती झरी जामनी येथे या सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना तसेच तज्ञ मार्गदर्शक यांना गटशिक्षणाधिकारी नगराळे, केंद्रप्रमुख दिकुंडवार व मार्गदर्शक आशिष साबरे यांच्या हस्ते चेस प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी व मुख्य पाहुण्याच्या हस्ते करून झाली. याप्रसंगी मान्यवरांनी प्रशिक्षणा विषयी मत सुद्धा व्यक्त केले. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन कशा प्रकारे केले जावे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये संभाषण करण्यास योग्य ते मार्गदर्शन करणे, शाळेचे वातावरण इंग्रजीमय करणे, विविध शैक्षणिक कौशल्यांचा उपयोग करून इंग्रजी या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यामध्ये गोडी निर्माण करणे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन परिणामकारक इंग्रजी विषयाचे अध्यापन करणे या गोष्टीचा समावेश होता.

गेल्या तीन वर्षा पासून इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चेस या नावाने प्रभावीपणे झरी या तालुक्यात सुरू आहे. माध्यमिक इंग्रजी शिक्षकांमध्ये या प्रशिक्षणामुळे उल्लेखनीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. या प्रशिक्षणाचा जो केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी आज इंग्रजीचे उत्तम रित्या धडे गिरवताना दिसत आहे. त्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे ही उल्लेखनिय बाब आहे.

या पूर्वी ही इंग्रजी विषयाचे अनेक प्रशिक्षण झाले परंतु चेस प्रकलपांतर्गत मिळालेले प्रशिक्षण हे खूपच प्रभावी ठरले असे शिक्षकांचे मत आहे. या प्रकल्पाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, सुभाष कांबळे संचालक रिजनल अकादमीक अथॉरिटी औरंगाबाद, रणजित देशमुख, नदीम, एम इ आर जगताप, इंग्रजी विषय सहायक संग्राम दहिफळे, साधन व्यक्ती मुंडाले यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंडाले यांनी केले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.