जब्बार चीनी, वणी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आज मंगळवार पासून पुढील तीन दिवस आपल्या भागातही पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. हा पाऊस पिकांसाठी घातक असल्याचे तज्ज्ञांची माहिती आहे.
यावर्षी दमदार पाऊस झाला. मात्र पिके आल्यानंतरही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीचा पाऊस कहर करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस पिकांचे नुकसान करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांना इशारा देण्यात आला आहे.
रविवारपासून उपविभागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आल्या होत्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मंगळवारपासून पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस काही पिकांसाठी फायदेशीर असला तरी अधिकाधिक पिकांसाठी तो घातक असल्याचे कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. यात धान, कापूस, सोयाबिन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)