मराठा सेवा संघातर्फे तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन

वणी परिसरात विविध ठिकाणी जाहीर व्याख्यानाची पर्वणी

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा व छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दिनांक 19 ते 24 फेब्रुवारपर्यंत छत्रपती महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाचे निमीत्याने वणी परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. 

दि.19 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता जिजाऊ चौक ते शिवतीर्थ पर्यन्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता शिवरायांच्या पुतळ्याजवळ विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रम व त्यानंतर छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन आणि जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

20 फेब्रुवारीला सिंधीवाढोणा, 21 फेब्रु. रोजी शिरपुर, 22 फेब्रुवारीला तेजापूर, 23 फेब्रुवारी नायगांव (बु) आणि 24 फेब्रुवारीला पुरड (पुनवट) येथे शिवजयंती सोहळा संपन्न होईल. दि 20 फेब्रूवारीला केसुर्ली येथे शरद वैद्य महाराज यांचे कीर्तनाचा आस्वाद भक्तांना घेता येणार आहे. वरील सर्व कार्यक्रमात समाज बांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन मराठा सेवा संघ परिवार आणि छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.