विदर्भ निर्माण यात्रेचे वणीत जंगी स्वागताची तयारी

0
58

जितेंद्र कोठारी, वणी :  विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे काळाची गरज आहे. विदर्भाच्या भूगर्भात विविध खनिज संपदेचा खजिना असताना विदर्भातील शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. विदर्भात कोळसा, डोलोमाइट, चुनखडीच्या खाणी असून येथील युवक बेरोजगारीची झळ सोसत आहे. बेरोजगारांच्या रोजगारासाठी, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, सिंचन आणि इतरही क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करण्यासाठी तसेच विदर्भाचे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्व विदर्भातून काळेश्वर सिरोंचा ते नागपूर व पश्चिम विदर्भातील सिंदखेडराजा (बुलढाणा) ते नागपूर अशी दुसरी विदर्भ यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्हीही यात्रेचा समारोप 5 मार्च  रोजी नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे.

पुर्वेकडील विदर्भ निर्माण यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर, जिवती, कोरपना मार्गे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. यावेळी यात्रेचे जंगी स्वागत करण्याची विदर्भवादी कार्यकर्त्यांनी केली आहे. विदर्भ प्रेमी जनतेनी व कार्यकर्त्यांनी विदर्भ यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भवादी प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, देवराव धांडे, प्रा.बाळासाहेब राजुरकर, नामदेव जेनेकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोलकर, अमित उपाध्ये, विजया आगबत्तलवार, शालिनी रासेकर, कलावती क्षीरसागर, अलका मोवाडे, सुषमा मोडक, दशरथ बोबडे, देवा बोबडे, सृजन गौरकार, धीरज भोयर, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकर, पुंडलिक पथाडे, व्हि.बी.टोंगे, उलमाले यांचेसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Relief Physiotherapy clinic
Previous articleमराठा सेवा संघातर्फे तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन
Next articleपेशवाई एकदा पुन्हा आपल्या उंबरठ्यावर उभी आहे
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...