केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित्य विविध उपक्रम

वृक्षरोपण, रक्त तपासणी करून दिवाळी साजरी

0

वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणी तर्फे विविध उपक्रम राबवून दिवाळी साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी 11 वाजता आनंद बालसदन मध्ये गरजुंना कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं तर आणि शासकीय आयटीआयजवळ वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर इंडियाना पॅथोलॉजी तर्फे आनंद बालसदनातील मुला मुलींची मोफत रक्तगत तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. अशी माहिती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे वणी अध्यक्ष रवी येरणे यांनी दिली.

सध्या वृक्षरोपणाचा 15 वा टप्पा सुरू आहे. यासाठी श्री मेडीकलचे स्वप्निल आंबटकर यांच्याकडून मोफत रोपटे आणि ट्री गार्ड देणगी स्वरूपात देण्यात आले. या सर्व रोपट्यांचं शासकीय आयटीआयमध्ये रोपण करण्यात आलं. सोबतच आनंद बालसदनातील मुलामुलींना खाऊचं वाटप देखील करण्यात आलं.

या कार्यक्रमाला श्रीकान्त खापर्डे आणि त्यांची टीम, अमित महाजन (अरुणोदय मेडी),कपिल उपाध्ये (यशोधन मेडी), सुनील ठाकरे (सुनील मेडी), सुनील बदकी (जनसेवा मेडी), जितेश डाबरे (नृरसिंह मेडी), स्वप्निल आंबटकर  (श्री मेडी) यांच्यासह संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा समस्त तालुका पदाधिकारी गण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.