आडव्या बाटलीसाठी निवडणूक का नाही ? मांगलीतील महिलांचा सवाल

ग्रामसभेत ठराव होऊनही आडव्या बाटलीसाठी निवडणूक नाही

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दारुचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गावातील लोकानी एकत्र येउन १५ ऑगस्टला ग्रामसभेत बंदीचा ठराव घेतला. त्यानंतर १५ दिवसापुर्वी महीलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन आडव्या बाटलीच्या निवडणुकीची मागणी केली. मात्र यांच्या निवेदनाला संबंधीत विभागाने केराची टोपली दाखवली आहे. ठराव होऊनही आणि वारंवार निवेदन देऊनही दारूच्या दुकानावर कार्यवाही का होत नाही असा सवाल मांगलीतील महिला करीत आहे.

मांगली येथील परवाना देशी दारुचे दुकान हे गावाच्या मध्यभागी असुन १५० फुटावर मोहरम सवारीचा बंगला, शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणीपुरवठा करणारी नळ योजना आहे. ह्या दारुदुकानातुन अवैधरीत्या देशीदारु ची विक्री आणि जादा भावाने विक्री होत असा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे स्थानिकांनी ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव केला मात्र निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करून दारूच्या दुकानावर कोणतीही कार्यवाही करत नाही. अखेर लवकरात लवकर येथे आडव्या बाटली साठी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी मांगली येथील महीला करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.