बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरम्बी) येथील नागभीड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांना दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात त्यांना वीर मरण आले. त्यांना वणीच्या शिवाजी पुतळ्यासमोर धनगर समाज बांधवांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शोकसंवेदना व्यक्त करताना प्रवीण खानझोडे म्हणाले प्रोटोकॉल नुसार शासन त्यांना आर्थिक मदत तर करणारच त्यामुळे शहीद झाल्याची मागणी करण्याची काहीही गरज नाही. कारण यथा राजा तथा प्रजा याप्रमाणे जर या राज्याचा राज्यकर्ता जसा असेल आणि राज्यकर्त्या तर्फे जनतेला ज्या पध्दतीने ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ते जर मिळत नसेल तर राज्यकर्त्यांनी समजले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी शोकसंवेदना करण्याकरिता शहरातील सामाजिक, राजकीय पुढारी संजय देरकर ,राजू उंबरकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिलीप परचाके, महेंद्र लोढा, प्रवीण खानझोडे , विवेक मांडवकर , मिलिंद पाटील, रमेश भोंगळे ,दिलीप कोटरंगे , दिलीप भोयर, पांडुरंग पंडिले, पिंकी लोणारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, वाहतूक निरीक्षक संग्राम ताठे यांनी मनोगतातून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.
प्रास्ताविक संतोष सांबरे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास चिडे यांनी केले. त्यानंतर समाजबांधवांनी शाहीद छत्रपती चिडे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावर लाभ द्यावा व कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे व गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार के सी ब्राम्हणवाडे यांना दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष शंकर उरकुडे, वसंता गोरे, प्रल्हाद चामाटे, काशीनाथ पचकटे, विलास शेरकी, सूर्यभान चिडे, मनोज खाडे , नितीन वैध, प्रमोद नवघरे, सुरेंद्र इखारे, , आशीष ढवळे, गौरव उगे ,नितीन चाहनकार, विनायक कांदळकर, अक्षय झिले, अरविंद अवगण, विलास बरडे व मोठ्या संख्येनी समाजबांधव उपस्थित होते.