छाया यशवंत जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन
माळीपुरा येथील रहिवासी होत्या. गुरुवारी सकाळी निघणार अंत्ययात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: माळीपुरा येथील रहिवासी असलेल्या छाया यशवंत जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या दोन तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. अखेर बुधवारी दिनांक 23 एप्रिल रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना बोलता येत नव्हते. शारीरिक अंपगत्वामुळे त्यांना आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला. त्या अविवाहित होत्या. त्यांच्यावर उद्या गुरुवारी दिनांक 24 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. स. 10 वाजता त्यांचे भाऊ देविदास जाधव यांच्या वॉटर सप्लाय येथील घरून छाया यांची अंतयात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. त्या स्माईल फाउंडेशनचे संस्थापक सागर जाधव यांच्या आत्या होत्या.
Comments are closed.