सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील चिखलडोह गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा चिखलडोह, भीमनाळा व कुंडी या गावातील दिव्यांग बांधवाना ५% दिव्यांग निधी मधून प्रत्येक लाभार्थीना ३००० रु प्रमाणे कुंडी ३ भीमनाला १ चिखलडोह १ अशा ५ व्यक्तींना आणि अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायत शिपाई व आशा सेविका यांना ग्रामपंचायत चिखलडोह तर्फे १००० रुपये प्रोत्साहनपर आरोग्य सेविका एस. के पंधरे यांच्या हस्ते देण्यात आले.
ग्रामपंचायतचे सरपंच सचिव व सदस्य यांनी स्वतः पुढाकार घेऊन लॉकडाऊनच्या काळात दिव्यान्ग व्यक्तीला आर्थिक आधार होणार. या उद्देशाने गावातील दिव्यान्ग बांधवाना निधी वाटप केला. त्यावेळी सरपंच दुर्गा टेकाम उपसरपंच प्रदीप बेलखेडे, ग्रामविकास अधिकारी आर डी पाटील पोलिस पाटील बापूजी पेंदोर तलाठी जे डी उमरे, शंकर दुधकोहळे, विशाल गुरनुले, गीता शेंद्रे उपस्थित होते.
गोरगरीब रोजमजुर काम करणाऱ्या दिव्यान्ग व्यक्तींना आधार याच निधीने होऊ शकते, असा विचार करून ग्रामपंचायतने धनादेश वाटप करून दिव्यान्ग व्यक्तींना एका प्रकारे आधारच दिल्याचे बोलले जात आहे. तसेच दाभाडी येथेही सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी लोकडाऊन मध्ये गरीब आदिवासी दिव्यान्गना आधार होईल या उद्देशाने ६ मे रोजी सरपंच सुभाष कुडमेथे यांच्या हस्ते ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी २ हजार प्रमाणे सुवर्णा चिकराम, चंद्रकला मडावी, कमिनीबाई आत्राम, शुभांगी आत्राम व पोतु टेकाम यांना धनादेश वाटप करण्यात आले.