शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरणाचे काम जोमात
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर चालणार स्वच्छता मोहीम
जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम 28 जुलै ला सुरू झाली असून 3 जुलै पर्यंत चालणार आहे. या वणीतील सर्व प्रभाग फवारणी करून निर्जंतूक केले जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी कार्यकत्यांना कोणताही गाजावाजा न करता वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वणीतील शिवसेनेने शहर निर्जंतूक करून वाढदिवस साजरा कऱण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी ठिक 10 वाजता वणीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.
शहरात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यातच पालिका प्रशासन शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही शहर निर्जंतुकीकरणाचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वास नांदेकर यांनी दिली. यावेळी रवि बोढेकर. गणपत लेडांगे, विक्रांत चचडा, महेश चौधरी, प्रशांत बलकी, अजय नागपुरे, मंगेश मत्ते, नंदा ढवस, सविता आवारी, पुष्पा भोगेकर, स्मिता नांदेकर, ललित जुनेजा, योगिता मोहोड, आवेश कोंगरे, संदीप सहारे, प्रवीण ठाकरे, संगिता मुरस्कर यांच्यासह शिवसैनिक हजर होते.