सीएम चषकचा वणीत थाटात शुभारंभ
बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषकचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शासकीय मैदानावर या महोत्सवाचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेचे उदघाटन करतांना खा. अहिर यांनी या स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडूंना एक मोठी संधी संधी असल्याचे नमूद केले. त्यानंतर महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे प्रत्यक्ष उदघाटन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूभाऊ तोडसाम, नगराध्यक्ष तथा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे. चंद्रपूर महानगर पालिकेचे उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय पिदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पावडे , तालुका अध्यक्ष संजय पिंपळशेंडे, शहर अध्यक्ष रवि बेलुरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया.
मारेंगावचे तालुका अध्यक्ष शंकर लालसरे, झरीचे तालुका अध्यक्ष अनिल पोटे , जिल्हा परिषद सदस्यां मंगलाताई पावडे, बंडूभाऊ चांदेकर, संघदीप भगत, पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नंदू उलमाले, स्पर्धा संयोजक वैभव कावरासे, प्रचार संयोजक मनीष गायकवाड सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी केले. यया स्पर्धा 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहेत.