न विझणारी रहस्यमयी कोळशाची आग कायमच….

कोल डेपोतील हजारों टन कोळशाला भीषण आग

विवेक तोटेवार, वणी: कोळसा असो की काहीही असो आग लागलीच तर ती काही तासांत किेंवा दिवसांत आटोक्यात येते. मात्र लालपुलिया परिसरात एफसीआय या कोल डेपोत लागलेली आग अधिकच रहस्यमयी होत चालली आहे. या डेपोतील कोळशाला मंगळवारी अचानक आग लागली. दोन ते तीन दिवसानंतर आग विझविण्यास सुरवात झाली. या आगीत जवळपास 10 हजार टन कोळसा जळून राख झाला असल्याची माहिती आहे. एक मशीनसुद्धा या आगीत जळाली आहे. परंतु अजूनही आग आटोक्यात आली नाही. आग विझविण्यास इतका विलंब का? हा प्रश्न निर्माण होतो आहे.

वणीतील लालपुलिया परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एफसीआय नावाने जुगलकिशोर अग्रवाल यांचा कोल डेपो आहे. या कोल डेपोचे संपूर्ण काम हे चंद्रकांत अग्रवाल हेच सांभाळतात. या कोल डेपोतून विविध कंपन्यांना कोळसा पुरविण्याचे काम होते. मंगळवारी होळीनंतर अचानक येथील एका कोळशाच्या ढिगाऱ्याला आग लागली. तसे उन्हाळ्याच्या दिवसात कोळशाला आग लागणे हे नवीन नाही. अनेक कोल डेपोंत असे होते. परंतु ज्या ठिकाणी आग लागली, तेथील कोळसा मशीनच्या साहाय्याने काढून त्यावर पाणी टाकल्यास आर्थिक हानी होत नाही. आगही आटोक्यात येते. परंतु एफसीआय येथे ही आग अधिकच भडकली. ठिकठिकाणी फक्त राखच उरली आहे. या ठिकाणी टँकर व अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु रविवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ही आग पूर्णपणे विझविण्यात अपयश आले. अजूनही अनेक ठिकाणी कोल डेपोत आग धडकत आहे. महत्वाचे म्हणजे या डेपोच्या अगदी जवळच रिलायन्स पेट्रोल पंप आहे. जर आग अधिकच भडकली असती तर काहीही होऊ शकले असते. आग विझविण्यास इतका विलंब का लावला हे न उलगडणारे कोडे आहे. हजारो टन कोळसा जाळून राख झाला आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या ठिकाणी 40 हजार टन कोळसा साठवणूक करण्यात आली होती. इतक्या मोठया प्रमाणात या ठिकाणी कोळसा का साठवला हाही एक प्रश्नच आहे. सोबतच ही कंपनी गुजरात येथील स्टील कंपनीला हा कोळसा पुरवठा करते. डिओ हा स्टील कंपनीचा असतो. तर ते प्लॉटवर उतरविण्याचे व कंपनीत पोहचविण्याचे काम हे एफसिआय यांच्याद्वारे केले जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.