विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वणी भालर रोडवरील लाठी या गावाजवळ अवैधरिता कोळसा चोरी करणाऱ्या गाडीस पकडले. पकडण्यात आलेल्या आईचर गाडीमध्ये जवळपास 5 ते 6 टन माल होता. सदर चोरी करिता वापरण्यात येणारे वाहन वेकोली रक्षकानी जप्त केले आहे. मात्र या कार्यवाहीत एक दुसरी गाडी अंधाराचा फायदा घेत निघून गेली.
वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती मिळाली की दोन गाड्यांमध्ये अवैधरित्या कोळशाची तस्करी केली जात आहे. त्यानुसार त्यांनी लाठी गावाजवळ एका गाडीला थांबवले. त्याचवेळी जवळपास 30 ते 40 चोरट्याने वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. या कार्यवाहीत दोनच सुरक्षा रक्षक असल्याने त्यांना कुणालाही पकडता आले नाही. मात्र त्यांनी अवैधरित्या कोळसा घेऊन जाणारी गाडी पकडली. सुरक्षा रक्षक आणि कोळसा तस्करांच्या झटापटीत वाहनचालक पसार झाला. तर दुसरी गाडी अंधाराचा फायदा घेऊन निघून गेली.
या घटनेची तक्रार अजूनही वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हि कार्यवाही थंड बसत्यात होते की काय हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे कार्यवाही होणार की सेटींग करून वाहन सोडून दिले जाणार याकडे आता कोळसा व्यावसायिकांचे व वणीकरांचे लक्ष लागले आहे .
परिसरात कोळसा चोरीच्या मोठ्या घटना होतात. अशा प्रकारच्या चोऱ्या थांबवायचा असल्यास वेकोलीला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वणीतील लालपुलिया परिसरातील अवैध असलेले कोळसा प्लॉट हटविणे गरजेचे आहे. तेव्हाच या तस्करीवर काही प्रमाणात का होईना प्रतिबंध येईल.