विवेक तोटेवार, वणी: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या इसमाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष पांडुरंग बुरडकर (50) असे मृतकाचे नाव आहे. ते गणेशपूर येथील रहिवासी होते. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या राहते घरी विष प्राशन केले होते. याबाबत माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रात्री 11 वाजताच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी 9.40 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुभाष यांनी विष का घेतले? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहे. यांच्या मागे एक मुलगा असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
