विवेक तोटेवार, वणी: वणीच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी मुतारीची व्यवस्था करण्यात आली होती. हे मुत्रीघर गेल्या 50 वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने बाजारपेठे होणारी दुर्गंधी व रोगराईचे कारण देत हे मुत्रीघर बंद केले होते. हे मुत्रीघर पूर्ववत सुरू करण्याची मागणी बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
वणीच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या (गांधी चौकात) एक मुत्रीघर होते. सदर मुत्रीघर हे 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून असल्याचे सांगितले जाते. मात्र काही दिवसांआधी नगर परिषदेकडून हे मुत्रीघर बंद करण्यात आले. नगर परिषदेकडून या मुत्रीघरासमोर कुलूप लावण्यात आले असून नागरिकांनी नगर परिषद आरोग्य विभागाच्या मागे असलेले मुत्रीघर वापरावे असा फलक या ठिकाणी लावला.
नवीन मुत्रीघर हे मुख्य बाजारपेठेपासून थोडे दूर आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या व्यापारी व व्यावसायिकांना आपले दुकान सोडून जाण्यास अडचण होत आहे. सदर मुतारी तात्काळ सुरू करावी शिवाय या ठिकाणी पाण्याची टाकी बसवून महिलांसाठी देखील व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, बबन केवरकर, रवींद्र चिडे, सूरज जाधव, सचिन जुनार, गणेश आत्राम, कमलेश खडसे, संदीप सिडाम, भारत कुलसंगे, ध्रुव येरने, महेश चौधरी, रोहित बोबडे, निखिल बोबडे, राजू वाघमारे, जगदीश, किशोर ठाकरे, त्रिलोक डाहे, निखिल गटलेवार, स्वप्नील गौरकार, अमित घुमे, नयन, गणेश सिडाम, मो. वझीर, इमरान शेख उपस्थित होते.
हे देखील वाचा:
