विवेक तोटेवार, वणी: शहरातील सम्राट अशोक नगर येथे राहणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दीपक महादेव कांबळे (60) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. दीपक हे पत्नी व मुले सोबत नसल्याने एकटेच सम्राट अशोक नगर येथे राहत होते. जवळपास 3 वर्षांपासून त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती जखम ठिक होत नसल्याने ते नेहमीच आजारी राहत होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी गळफास घेतल्याचे शेजा-यांच्या निदर्शनास आले. शेजा-यांनी त्यांच्या मुलाला सांगितली. त्यांनी आजारपणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.