Exclusive: मारेगाव ग्रामीण रुग्णालयात परिचर करतो औषधी वाटप

रुग्णांच्या आरोग्याशी प्रशासनाचा खेळ

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, औषधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ऐरणीवर आलीये. रुग्णाच्या दिमतीला चक्क शालेय तपासणी करणारे डॉक्टर सर्व रुग्णाची तपासणी करीत असुन, औषधी वाटपाचं काम चक्क परीचर करीत असल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे इथल्या रुग्णसेवेचे धिंडवले उडाले आहे.

रुग्णाला बरे होण्यासाठी रुग्णालयातच औषधी दिली जाते. एखाद्या रुग्णाला जर चुकीची औषधी गेल्यास रुग्णांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. प्रसंगी चुकीच्या औषधीमुळे जीवही गमवावा लागू शकतो. मात्र याबाबत प्रशासनाला रुग्णांच्या आरोग्याशी काहीही देणं घेणं नसल्याचं दिसत आहे. इथं औषधी संबंधी कोणतीही माहिती नसलेला परिचर हा औषदगी वाटपाचं काम करत आहे.

(मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा)

रुग्णालयात फार्मसिस्ट ही एक औषधी वाटपासाठी पोस्ट असते. मात्र हे पद अद्याप भरलं न गेल्यानं परिचर इथं औषधी वाटपाचं काम करत आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. मनसे रुग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत उपोषणाला बसली आहे. मात्र प्रशासननं अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.