कॉम्रेड गीत घोष यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

संघर्षाचे दूसरे नाव म्हणजे गीत घोष- उत्तम गेडाम

बहुगुणी डेस्क, वणी: कॉ. “गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाचे असून, शोषित, पीडीत, आदिवासी, सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा व गरजांचा त्याग करून ते आदिवासींच्या हक्कांसाठी बौद्धिक व आंदोलनात्मक भुमिका घेऊन लढत आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय असून संघर्षाचे दूसरे नाव गीत घोष आहे.” असे मनोगत गीत घोष यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कवि, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गेडाम यांनी व्यक्त केले. वणीतील विश्रामगृहात 24 जून रोजी हा कार्यक्रम पार पडला. अ. भा. संवैधानिक हक्क परिषद, आदिवासी सोशल फोरम, वणी च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वाढदिवस सोहाळ्याचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी तथा कवि व साहित्यिक उत्तम गेडाम हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर, यवतमाळ, सामाजिक कार्यकर्त्या बेबी मेश्राम, वणी, आदिवासी सोशल फोरमचे अध्यक्ष रमेश मडावी हे होते. तसेच भाऊरावजी आत्राम, मंथना सुरपाम, महेश आत्राम, चेतन सुरपाम हे उपस्थित होते.

पुढे बोलताना उत्तम गेडाम म्हणाले की, “गीत घोष हे आपल्या आयुष्याचा त्याग करून कण आणि कण, ज्ञान आणि संघर्ष समाजासाठी समर्पित करत आहेत.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले, प्रमुख अतिथीनी बोलताना आज जी ओळख आहे ती गीत घोष साहेबांच्या मार्गदर्शन आणि पुढारपणामुळेच निर्माण झाली आहे,असे मत व्यक्त केले. सर्वांनी त्यांना शत आयुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संतोष चांदेकर यांनी केले तर आभार कृष्णाजी मडावी यांनी मानले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.