ऑनलाईन मोफत करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे आयोजन
शासनाच्या "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत आयोजन, पूर्वनोंदणी आवश्यक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थी याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक 09 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राज्यातील 75000 युवकांच्यासाठी विक्रमी कार्यशाळा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिनांक 7 ऑगस्ट 2022 पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या करिअर विषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
https://forms.gle/juqf2szEy8qyjozB9 या लिंकवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. करिअर कट्ट्याचे सर्व उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सदर चॅनल सबस्क्राईब करावे अशी विनंती करण्यात आली आहे. https://youtube.com/c/uvajagar या लिंकवर इच्छुकांना ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. उपस्थित सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. रोहित वनकर व डॉ. रंजना जिवणे जिल्हा समन्वयक यवतमाळ जिल्हा जिल्हा यांनी केले आहे.
Comments are closed.