वणी तालुक्यातून काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्ता वाशिमला रवाना

उद्या भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी वणी येथून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या वाशिमला रवाना झाल्या आहेत. काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्या खासगी ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी वाशीमला रवाना झाल्या. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष (महिला विंग) वंदना आवारी यांच्या नेतृत्त्वात या महिला उद्या रॅलीत सहभागी होणार आहेत. तर पक्षाचे इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ता मंगळवारी सकाळी वाशिमला जाणार आहे.

कन्याकुमारी येथुन निघालेली भारत जोडो यात्रा 60 दिवसाचा प्रवास करून 7 नोव्हेंबर ला नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा विदर्भातील वाशीम, बुलडाणा आणि अकोला या जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असून उद्या 15 नोव्हेंबरला यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहे. वणी तालुका काँग्रेसचे कार्यकर्ता वाशिम येथे यात्रेत सहभागी होणार आहे

अखंड भारताची संकल्पना घेऊन भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे जागोजागी समविचारी राजकीय पक्षासहित सामाजिक संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत केले जात आहे. या देशातील हुकुमशाहीचा नायनाट करण्यासाठी मी चालणार. या देशव्यापी भावनेतून लाखो नागरिक या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा, वंदना आवारी, पुरुषोत्तम आवारी, संजय खाडे, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, आशिष खुळसंगे, रवी देठे, राजाभाऊ बिलोरिया, संध्या बोबडे, सविता ठेपाले, संगीता खाडे, वंदना धगडी, कविता चटकी, शारदा ठाकरे, नीलिमा काळे, प्रमिला चौधरीसह वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.