जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुनील ढाले

0

सुशील ओझा, झरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा संपूर्ण जिल्ह्यात गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा संदेशयात्रेचे आयोजन वणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वजाहत मिर्जा होते.

Podar School 2025

प्रमुख वक्ते प्रा म. ना जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार नारेशबाबू पुगलिया, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे होते. यावेळी झरी तालुक्यातून मांगली येथील युवा नेतृत्व शिक्षक सुनील ढाले यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील काँगेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पदाची घोषणा करून आमदार वजाहत मिर्जा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. ढाले यांच्या नियुक्तीने तालुक्यात मोठा उत्साह निर्माण झाला असून मोठा जल्लोश करण्यात आला.

ढाले  हे बाजार समितीचे संचालक असून एक तडफदार नेतृव करण्याची क्षमता त्यांच्यात असून युवापासून वयोवृद्धा पर्यंत त्यांची एक वेगळी ओळख आहे. सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने काँग्रेसला तालुक्यात एका प्रकारे नवसंजीवन मिळाल्याचे बोलले जात आहे. आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावार यांना देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.