संचारबंदीत खर्रा, दारूचा काळाबाजार

पोलिसांची नजर चुकवून घरपोच मिळते सेवा

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या संचारबंदीतही तालुक्यात खर्रा आणि दारूची लपून छपून चढ्या भावात अवैध विक्री सुरू आहे. या वस्तू आता घरपोचही दिल्या जात आहेत. त्यातच पान मटेरिअलवाल्यांनी तसेच काही अवैध रित्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांनी मनाला ‘पटेल’ असा रेट ठेवल्याने चिल्लर विक्रीमध्येही रेट जवळपास दिडपट झाला आहे.

कोरोना विषाणूचा देशासह राज्यातही झपाट्याने प्रसार होत आहे. पंतप्रधानांनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तालुक्यात याची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. बाजारपेठ पूर्णत: ठप्प असून रस्त्यांवर शुकशुकाट आहे. पानटप-याही बंद आहेत. मात्र, शौकिनांची गरज लक्षात घेऊन पानटपरीच्या परिसरात उभे राहून अथवा घरपोच खर्रा, तंबाखू, सूगंधित पानमसाल्याची चढ्या दरात विक्री केली जात आहे.

यात तरूणवर्गाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेकांनी तर घरीच दुकान थाटल आहे. काही ठिकाणी लक्षात येताच पोलीस पथक धाडी टाकतात मात्र पोलिसांची नजर चुकवून खर्रा विकला जात असल्याचे चित्र आहे. सुगंधित तंबाखूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. दारूविक्रेतेही दारू काळा बाजार करीत असल्याचे चित्र आहे.

काळ्या बाजारात पूर्वीच दोनशे रूपयांना मिळणारी विदेशी बाटलीची 400 रूपयांना विक्री होत आहे. तर काही विक्रेते बंदचा फायदा घेऊन मिक्सिंग करूनही दारू विकत आहे.  तर काही दारूविक्रेते शौकिनांना मागणी केल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून घर पोहोच सेवा ही देत आहे. काही महाभाग तर फोनवर चहा व खर्रा पाहीजे त्या ठिकाणी पोहोचवुन देत आहे.

मनाला ‘पटेल’ असा सुगंधी तंबाखुचा दर
या बंदमध्ये पान मटेरीयलवालेही चांगलेच ‘हात’ धुवून घेत आहे. आधीच अवैध असलेला सुगंधी तंबाखू आणि सुपारी याचे दर ही वाढवले आहे. त्यातही ग्राहकाच्या मनाला ‘पटेल’ अशी घरपोच सेवा दिली जात आहे. सध्या 500 रुपयाच्या सुपारीचा दर 700 रुपये तर 900 रुपये मजा सु्गंतीध तंबाखुचा डबा आता 1400 रू खपत आहे. रेट वाढल्याने अवैध खर्रा विक्रेत्यांनीही खर्र्याचा रेट वाढवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.