पांढरकवडा येथे कोरोनाचा कहर, शतकी आकड्याकडे वाटचाल

रुग्णांची संख्या 93, प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

0

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यानंतरही पांढरकवडा शहर काही दिवसांआधी कोरोनापासून कोसो दूर होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाने शहरात चांगलेच पाय पसरले आहेत. रविवारी रात्री उशिरा अचानक 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह शहरात चांगलीच खडबळ उडाली आहे. आता पांढरकवडा येथे रुग्णांची संख्या 93 झाली असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

पांढरकवडा शहरात 8 जुलै पर्यंत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. मात्र 9 जुलै रोजी मध्यप्रदेशातून शास्त्री वॉर्डमध्ये घरी परतलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली व रुग्णांची संख्या दोन झाली. मात्र मस्जिद वार्ड येथील 38 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू  झाल्यानंतर त्याचा संपर्कातील व्यक्तींना पांढरकवडा येथील वन भवनमध्ये क्वारटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. तेव्हापासून शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

24 जुलै ला मस्जिद वार्ड व्यतिरिक्त हनुमान वार्ड परिसरातील आणखी एक रुग्ण आढळला. हनुमान वॉर्डातील रुग्ण असणारा परिसर सिल करून त्या रुग्णाच्या संपर्कातील 30 लोकांना क्वारटाईन करण्यात आले व त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी शहरात कोरोनाने आपलं अर्धशतक पार करत 53 आकडा गाठला. परंतु रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये शहरात एकाचवेळी आणखी 40 पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

यात मस्जिद वार्ड येथील 32 तर हनुमान वार्ड येथील 8 रुग्णांचा समावेश आहेत. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 झाली आहे. पांढरकवडा शहरात मस्जिद वार्ड हॉटस्पॉट असून आता हनुमान वॉर्डातील 8 रुग्ण आल्याने प्रशासनाचा व नागरिकांचा चिंतेत भर पडली आहे.

झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण संख्येने प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर तान वाढत आहे. नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शहरात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन असल्याने नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे. पोलीस प्रशासन, नगर परिषद, आरोग्य यंत्रणा शहरात प्रसार वाढू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.