झरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सावधगिरी बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

0
Sagar Katpis

सुशील ओझा, झरी: तालुका कोरोनामुक्त झाल्यानंतर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुकुटबन येथील एका दिड वर्षांच्या चिमुकल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याचे आई व वडील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी मुकुटबन येथील एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला ताप येत असल्यामुळे त्याला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना मुलामध्ये कोरोनाचे लक्षणं आढळल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. मुलासह आई वडिलांनी कोरोनाची टेस्ट केली असता फक्त मुलगा हा पोजिटिव्ह निघाला. तर त्याचे आई-वडील निगेटिव्ह आले आहेत.

रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मुकुटबन गावातील हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण आहे. गावात आणखी रुग्ण वाढणार तर नाही ना ? असाही भिती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण ग्रामवासीयांनी कोरोना पासून दूर राहण्याकरिता शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आरोग्य व महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!