सुशील ओझा, झरी: अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्याकरिता सक्त मनाई केली असताना अनेकजण चारचाकी, दुचाकी, सायकल व पायदळ फिरताना दिसत आहे. अश्या लोकांना प्रशासनाकडून विचारणा केली असता मेडिकल, किराणा, दवाखाना नाहीतर कुणाच्यातरी मय्यतीमध्ये गेल्याचे सांगताना पहायला मिळत आहे. यातील अनेक लोक खोटे कारणं देत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची जागेवरच कोरोना टेस्ट करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
28 मे रोजला कृषि उत्पन्न बाजार समिती समोरील नाक्यावर ठाणेदार धर्मा सोनुने यांनी पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची मोठी टीम घेऊन पोहचले व कोरोना टेस्ट करण्याकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी याना पाचारण केले. आरोग्य विभागाचे महिला कर्मचारी उपस्थित झाल्या. दुपारपासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत विनाकारण घराबाहेर पडणा-या 96 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आले.
कोरोना टेस्टिंग मुळे अनेकांचे दाबे दणाणले असून कोविड सेंटर मध्ये पाठविण्याच्या भितीने बिनकामाने घराच्या बाहेर फिरणार्याचे दाबे दणाणले आहे. अत्यावश्यक कामे असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे विनाकारण बाहेर पडून कोरोनाचा संसर्ग पसरविणाऱ्या तसेच शासनाच्या नियमाची पायमल्ली करणारे लोकांवर कार्यवाही होणारच. तरी जनतेनी घरातच रहा व सुरक्षित रहा असे आवाहन ठाणेदार सोनुने यांनी केले आहे.
हे देखील वाचा: