पांढरकवडा येथे कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल….

आज आढळले 23 रुग्ण, एका वृद्धाचा मृत्यू

0

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात कोरोनाचे आपला विळखा चांगलाच घट्ट केला असून आज शहरात 23 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले. यात 13 महिला व 9 पुरुष आहेत. शहरात सध्या कोरोना बधितांची संख्या 197 झाली आहे. आज दु:खद घटना म्हणजे महादेव नगर येथील एका 75 वर्षींय वृद्धाचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. हा पांढरकवड्यातील कोरोनामुळे झालेला दुसरा मृत्यू आहे. दरम्यान आज पांढरकवडा येथील लॉकडाऊन हटवण्यात आले असून बाजारपेठ शासनाने दिलेल्या वेळेनुसार  सुरू राहणार.

आज जाहीर केलेल्या अहवालानुसार वैभवनगर येथे नव्यानेच एक रुग्ण आढळून आला तर हनुमान वॉर्ड परिसरातील 5 व शहरातील मेन लाईन येथील 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. काल पर्यंत मेन लाईन परिसर कोरोनामुक्त होता परंतु एकाच दिवशी मेन लाईन परिसरात 17 पॉझिटिव्ह मिळाल्याने प्रशासनासह नागरिकांची झोप उडाली आहे.

याव्यतिरिक्त शहरात हॉटस्पॉट असलेल्या मस्जिद वॉर्ड व हनुमान वॉर्ड असताना आता मेनलाईनमध्ये एकाच वेळी 17 रुग्ण आढळल्याने हा देखील कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. रविवारी रात्री या रुग्णांचा रिपोर्ट पॉजटिव्ह आल्याचे कळताच त्यांना रात्रीच ट्रामा केअर सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आज शहरात पॉझिटिव्हची संख्या 197 झाली आहे. यापैकी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणा-या काही रुग्णांना सुटी झाली आहे. तर उर्वरित रुग्णांवर वन भवन, सामाजिक न्याय भवन व ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांत होणारी वाढ बघता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.