ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव, भांदेवाड्यात आढळले 10 पॉजिटिव्ह

वणी शहरात दुसरे लसीकरण सुरू करण्याची आमदारांची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आज गुरुवारी दिनांक 1 एप्रिल रोजी तालुक्यात 20 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 5 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर, नांदेपेरा रोड, रंगारीपुरा, भीमनगर, आनंद नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात भांदेवाडा येथे तब्बल 10 रुग्ण तर पळसोनी, चिखलगाव, पिंपळगाव, कुंड्रा, नायगाव खुर्द येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण होत नसल्याने शहरात आणखी एक लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

गुरुवारी दिनांक 1 मार्च रोजी 159 संशयीतांचे अहवाल यवतमाळ येथून प्राप्त झाले. यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 146 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 452 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 445 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 61 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 452 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 29 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 85 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 48 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 25 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1517 रुग्ण आढळून आलेत. यातील 1406 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

वणीत दुसरे लसीकरण केंद्र सुरू करा: आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वयाच्या 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण दि. 1 एप्रिल पासून सुरू झाले आहे. वणी सारख्या मोठ्या शहरात ग्रामीण रुग्णालयात केवळ एकच लसीकरण केंद्र आहे. सीमित जागा, उपलब्ध कर्मचारी वर्ग यातून रोज 300 लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे वाटत नसल्यामुळे ट्रामा केअर सेंटर किंवा इतर सोईच्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी व जागेसह दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

वणीतील बस स्थानकजवळ आढळले दोन इसमांचे मृतदेह

अबब… ! चिंचमंडळ येथे आढळला 28 किलोचा महाकाय मासा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.