जब्बार चीनी, वणी: कोरोना रुग्णांची संख्या काहीशी घटत असताना अचानक कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज शुक्रवारी दिनांक 11 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण वणी शहरातील आहे. यातील 2 रुग्ण हे प्रगतीनगर तर कनकवाडी, शेतकरी मंदीर जवळ 1-1 रुग्ण आढळला आहे. आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 23 झाली आहे. अलिकडे कोरोनावर मात करणा-यांचा दर अधिक असल्याने तालुक्याला दिलासा मिळत असतानाच आज अचानक कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर रुग्णसंख्येचा दर वाढला तर पुन्हा लॉकडाऊनची नामुश्की येऊ शकते.
आज यवतमाळहून 78 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. तर आज 45 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 21 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 42 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 23 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 3 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 15 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 5 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.
तालुक्यात कोरोनाचे एकूण 5256 रुग्ण आढळून आलेत. यातील 5140 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या