शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. गुरुवार पेक्षा ही संख्या दोनही अधिक आहे. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील लक्ष्मीनगर, गंगाविहार, रंगारीपुरा, जैन स्थानकजवळ प्रत्येकी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात झोला येथे 2 तर गणेशपूर येथे एक तर मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 41 आहेत. दरम्यान व्यापारी वर्ग आणि सर्वासामान्यांसाठी महत्त्वाची घडामोड म्हणजे शनिवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत लागणारी 40 तासांची संचारबंदी व लॉकडाऊनला स्थगिती देण्यात आली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी यांनी आज आदेश काढला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गासह सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे.

आज शुक्रवारी दिनांक 12 मार्च रोजी 102 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळ येथून प्राप्त झालेत. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 97 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. गुरुवारी 12 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 9 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 91 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 203 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान आज 4 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 41 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 8 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 21 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 12 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1292 रुग्ण आढळून आलेत. यातील 1226 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

शनिवारी संध्याकाळपासून लागणारा लॉकडाऊन रद्द
गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेला शनिवारी संध्याकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत लागणारा लॉकडाऊन व संचारबंदी रद्द करण्यात आली आहे. आज याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने व्यापारीवर्गासह सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे. दरम्यान बाजारपेठेचा वेळ हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंतच राहणार आहे.

हे देखील वाचा:

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

आरसीसीपीएल तर्फे होतकरू महिलांचा सत्कार

Leave A Reply

Your email address will not be published.