ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

जैताई देवस्थान अन्नछत्र समितीतर्फे दवाखान्याला दोन कुलर भेट

0

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांनाही उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणार त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर जैताई मंदिर देवस्थान संचालित अन्नछत्र समितीतर्फे वणी ग्रामीण रुग्णालयाला दोन कुलर भेट देण्यात आले. समितीच्या या पुण्यकार्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात रुग्णांना उन्हाचे चटके सहन करावा लागणार नाही.

यंदा मार्च महिन्यातच उष्णता उचांक गाठत आहे. तीव्र उष्णतेमुळे सर्व सामान्य नागरिकांना कुलर किंवा एसीच्या थंड हवेत बसावेत वाटत आहे. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात सिलिंग फॅन व्यतिरिक्त थंड हवेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. सद्यः कोरोना लसीकरण मोहीम चालू असून दवाखान्यात मोठ्या प्रमाणात वृद्ध नागरिकांची गर्दी आहे. त्यातच उन्हामुळे रुग्णांचे हाल सुरू होते.

नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दवाखाना परिसरात विश्राम कक्ष सुरू करण्यात आले. त्यानंतर बुधवार 10 मार्च रोजी अन्न छत्र समितीने थंड हवेची व्यवस्था केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अन्न छत्र समिती तर्फे शुक्रवार पासून कोविड लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना चहा बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालयाला कुलर भेट देताना अन्न छत्र समितीचे अध्यक्ष मुन्ना पोतदार, उपाध्यक्ष मूलचंद जोशी, मंदिर समिती कार्यवाह माधवराव सरपटवार, दिवाण फेरवानी, नामदेव पारखी, मयूर गोयनका, वैदयकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

 

Leave A Reply

Your email address will not be published.