चेंडकापूर येथे कोरोनाचा शिरकाव, आज 4 पॉजिटिव्ह

अद्याप 337 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. कालपेक्षा ही संख्या चारने कमी आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 3 रुग्ण तर 1 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील साईमंदिर, नगरवाला परिसर व भीमनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात चेंडकापूर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 40 आहेत.

आज शनिवारी दिनांक 13 मार्च रोजी 59 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 55 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 135 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 337 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान आज 5 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 6 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 23 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 11 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1296 रुग्ण आढळून आलेत. यातील 1231 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे

Leave A Reply

Your email address will not be published.