जब्बार चीनी, वणी: आज शु्क्रवारी दिनांक 2 एप्रिल रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 7 तर ग्रामीण व इतर भागातील 5 रुग्ण आहेत. वणी शहरात जैताई नगर येथे 3 तर गुरुनगर, जैन ले आउट, सिंधी कॉलनी, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात झरी तालुक्यात 2 व शिंदोला, मानकी, लालगुडा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान उद्यापासून वणी शहरात दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध राहणार असून त्यांना त्वरित लस देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शुक्रवारी दिनांक 2 मार्च रोजी 10 संशयीतांचे अहवाल यवतमाळ येथून प्राप्त झाले. यात 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आली तर 9 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 372 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 11 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 361 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 134 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 514 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 4 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली
सध्या तालुक्यात 93 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 35 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 30 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 28 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1529 रुग्ण आढळून आलेत. यातील 1410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: