जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तालुक्यात अवघे 29 रुग्ण आढळलेत. यात शहरातील अवघा 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात वरझडी येथे सर्वाधिक 16 रुग्ण आढळलेत. तर बोरी येथे 6 रुग्ण आढळलेत. दरम्यान आज 118 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रुग्णसंख्येचा दर हा 6.6 टक्के आहे. कालपेक्षा हा दर अधिक आहे. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 294 आहे. दिवसेंदिवस ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे.
आज वणीत तेली फैल येथे 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 28 रुग्णांमध्ये वरझडी येथे सर्वाधिक 16 तर बोरी येथे 6 रुग्ण आढळलेत. गोपालपूर, मुर्ती, मेंढोली, मंदर, कोलेरा व उकणी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 364 अहवाल प्राप्त झालेत. यात 26 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 88 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 364 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 769 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 294 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 36 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 294 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 46 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5140 रुग्ण आढळून आलेत. यातील 4763 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 83 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आज रुग्णसंख्येचा दर अधिक, पण…
एकूण आरटीपीसीआर व ऍन्टीजनच्या एकूण 434 रिपोर्टपैकी 29 जण पॉझिटिव्ह आले आहे. रुग्णसंख्येचा 6.6 इतका आहे. काल हा दर 2.6 टक्के इतका होता. मात्र यातील अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण हे एकाच गावातील आहे. सध्या खेडोपाडी टेस्ट कॅम्प होत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. तसेच लॉकडाऊनचा फायदाही दिसून येत आहे. त्यामुळे आज शहरात अवघा 1 रुग्ण आढळला आहे.
हे देखील वाचा:
एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….