आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

तालुक्यात आढळले 45 पॉझिटिव्ह तर 60 रुग्णांची कोरोनावर मात

0

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी आशादायी ठरला. आज मंगळवारी दिनांक 27 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आहे. आज तालुक्यात 45 रुग्ण आढळलेत तर 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 15 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 28 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. विशेष म्हणजे आज आरोग्य विभागाने तब्बल 584 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहे. अधिकाधिक व्यक्तींच्या टेस्ट होणे ही एक दिलासादायक बाब आहे. आज दोन रुग्णांचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक 67 वर्षीय पुरुष आहे. तर एका 42 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वणी शहरात आलेल्या 15 रुग्णांमध्ये आज काठेड ले आउट व टागोर चौक येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेत तर सिंधी कॉलनी, वॉटर सप्लाय, विठ्ठलवाडी, वासेकर ले आऊट. राधानगरी, प्रगतीनगर, जैन ले आऊट, टिळक नगर, गुरुनगर, सर्वोदय चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात आलेल्या 28 रुग्णांपैकी गणेशपूर येथे सर्वाधिक 8 रुग्ण तर राजूर येथे 4 रुग्ण, चिखलगाव व सावर्ला येथे प्रत्येकी 3 रुग्ण, भालर व शिरपूर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. यासह गोवारी पार्डी, नायगाव (खु) निळापूर, नांदेपेरा, राजूर कॉलरी, परम़डोह येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहेत. तर घुग्गुस वव मारेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण आज वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 159 अहवाल प्राप्त झालेत. यात 21 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 113 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 24 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 584 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1638 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 589 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 35 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 517 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 37 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2826 रुग्ण आढळून आलेत. यातील 2191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 46 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

कोरोनाला घाबरू नका, मी आपल्या सोबत… खासदारांची भावनिक साद

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!